शेतकरी फार्म हाऊस योजना 2025
तुम्ही शेतकरी आहात का? तुमचं फार्म हाऊस बांधण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? तर मग हा व्हिडिओ संपुर्ण पाहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत “शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस बांधण्याची लोन योजना” बद्दल सविस्तर माहिती.
शेतकरी फार्म हाऊस ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उपकरणांचे संरक्षण, पिकांचे रक्षण, आणि स्वतःच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित निवास स्थळ तयार करण्यासाठी मदत करेल. चला योजना नक्की काय आहे ते पाहूया.
सरकारी आदेशानुसार, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवता येईल, ज्याचा उपयोग ते फार्म हाऊस बांधण्यासाठी करू शकतील. या योजनेचा उद्देश शेतीला एक व्यवसाईक दृष्टिकोनातून पाहण्याचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक सर्व कर्जपुरवठा मिळणार आहे ज्याद्वारे ते फार्म हाऊस बांधू शकतील. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. कृषि टर्म लोन (ATL) हे शेतकऱ्यांना मिळणारे एक प्रमुख कर्ज आहे, ज्याचा वापर फार्म हाऊस बांधण्यासाठी करता येईल.
चला तर शेतकरी फार्म हाऊस योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सुरु केलेली हि योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणारी असणार आहे .
या योजनेसाठी शेतकऱ्याला कर्जफेड करण्यासाठी दिर्घकालीन मुदत दिलेली आहे .
कर्जफेडीची मुदत मोठी असल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक सामाजिक जिवनावर कुठलाच परिणाम होणार नाही .
विशिष्ठ अटी पूर्ण केल्यानंतरच या योजनेची उपलब्धता शेतकऱ्याला होणार आहे .
शेतकरी वर्गाला त्यांची शेती व्यावसायिक पद्धतीने करणे आवश्यक आहे .
जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात भरमसाठ वाढ होईल आणि गावपातळीवर विकासाला चालना मिळण्यास मदत होईल .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि पात्रता आहेत. चला तर मग पाहूया ते काय आहेत
अर्ज करणारा शेतकरी स्वतंत्रपणे शेती व्यवसाय करीत असावा.
अर्ज करणाऱ्यांकडे किमान 2.5 (अडीच ) एकर शेती असावी.
शेतकऱ्याचे शेतीतून आणि शेतीशी निगडित व्यवसायातून योग्य आर्थिक उत्पन्न असावे.
अर्ज करणाऱ्यांकडे कर्जाची मागील तीन वर्षांतील किमान हप्ते थकीत नसावेत.
शेतकऱ्यांच्या नावावर एकाच बँकेत खाता असावा, आणि एकाच बँकेत कर्ज घेतलेले असावे.
अर्जदार हा किमान १८ वर्ष वय पूर्ण केलेला असावा .
अर्जदाराचे वय ६५ वयापेक्षा जास्त नसावे ,किंवा वय वर्ष ६५ पेक्षा जास्त असल्यास उत्पन्न स्र्तोत जो असेल त्याचे प्रमाणपत्र आवश्यक
चला तर पाहूया किती कर्ज मिळू शकते?
अडीच एकर जमीन असणारा शेतकऱ्यांना दोन लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
तर पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दहा लाख ते 50 लाख कर्ज मिळू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील जमिनीच्या प्रमाणानुसार कर्ज मिळू शकते, ज्यामुळे ते फार्म हाऊस बांधू शकतील.
चला तर जाणून घेऊया कोणती कागदपत्रे लागतील
लोन फॉर्म No – 138 लोन अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे.
7/12 आणि 8अ कागदपत्रे
इन्कम टॅक्स रिटर्न – जर शेतकरी व्यवसाय किंवा नोकरी करत असेल तर.
सर्च रिपोर्ट आणि बांधकाम बजेट – फार्म हाऊस बांधण्यासाठीच्या खर्चाची माहिती.
अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र.
चला तर जाणून घेऊया फार्म हाऊसचे फायदे काय आहेत ?
काढलेले धान्य सुरक्षित ठेवता येईल.
शेतकऱ्यांचे उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी फार्म हाऊस उपयोगी आहे.
पावसाळ्यात शेतकऱ्यांना राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण.
उष्णता, पाऊस, वाऱ्यापासून रक्षण.
फार्महाऊस विमा आवश्यक
अर्जदार शेतकऱ्याला या योजनेसाठी संपूर्ण मालमत्तेचा विमा उतरावा लागेल, ज्या जमिनीवर शेतकरी बांधकाम करणार आहे त्या जमिनीवर काही अपरिहार्य घडल्यास त्या सर्व घेतलेल्या कर्जाला सुरक्षा कवच प्राप्त होत असते
चला तर पाहूया कर्ज परतफेड कधी करावी ?
-कर्जाची परतफेड हि कर्जाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर पुढील १८ महिन्याच्या आतच कर्जाची रक्कम परतफेडीची सुरवात करावी लागते .
-शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी तिमाही,सहामाही ,वार्षिक किंवा मासिक स्वरुपात करता येईल.
-शेतकरी फार्महाऊस योजनेच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १५ वर्षांपर्यंत असू शकतो .
शेतकरी फार्महाऊस योजना अंतर्गत कर्ज घ्यावयाचे असल्यास तारण ठेवणी आवश्यक आहे.
कर्जाच्या तारणसाठी दोन जामीनदार आवश्यक ,त्यांचे कागदपत्रे सुद्धा आवश्यक आहे .
शेतकऱ्याला फार्महाऊस ज्या जमिनीवर बांधायचे आहे त्या जमिनीला कर्जासाठी तारण म्हणून ठेवावे लागेल .
चला तर जाणून घेऊया बँकेच्या व्याजदराची माहिती
फार्महाऊस योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतःच्या जवळील २५% खर्च करावा लागतो तसेच बँकेचे कर्ज जेंव्हा मिळते तेंव्हा बँकाही काही स्वतःचे मार्जिन घेत असते.
शेतकरी फार्म हाऊस या योजनेबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी https://bankofmaharashtra.in/ mar/farmhouse-agriculturists- scheme या वेबसाईटला भेट द्या .