Site icon

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तीन आरोपी खून प्रकरण


 बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील सूत्रधारासह अन्य काही जण फरार आहेत.
 संतोष देशमुख या प्रकरणांमध्ये नवीन नवीन माहितीसमोर येत आहे.
नुकतीच माहिती समोर आली आहे की संतोष देशमुख यांच्या तीन आरोपींची हत्या करण्यात आली आहे.
चला तर पाहूया नक्की हे प्रकरण काय आहे.
देशमुख खून प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे. देशमुख खून प्रकरणातील फरारी तीन आरोपींचा मर्डर झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी तो आरोप करताना त्यांना आलेल्या व्हाईस मेसेज ऐकवून दाखवला आहे, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने बीडमधील राजकीय नेते आणि गुंडगिरी या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, मला शुक्रवारी (ता. 28 डिसेंबर) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास मला एका अनोळखी नंबरवरून दोन फोन आले होते. त्यांनी मला व्हॉटस अॅप कालवर या, असे आवाहन केले होते. मात्र, अनोळखी नंबरसाठी माझे ‘व्हॉट्स अॅप’ कॉल सायलेन्स असल्याने मी त्यांना तुमच्याकडील माहिती मला टेक्स्ट मेसेज करा, अशी विनंती केली. त्यांनी मला दोन व्हाईस मेसेज पाठवले होते. मी ते पाहताच त्यांनी ते डिलिट केले.
त्या व्हाईस मेसेजमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, संतोष देशमुख खून प्रकरणातील फरारी तीन आरोपी मिळणार नाहीत, कारण त्यांचा मर्डर झाला आहे. त्यांचे मृतदेह कर्नाटक हद्दीत मिळाले असल्याचे सांगितले. त्याबाबत मला खात्रीशीर माहिती नाही. ही माहिती मी बीडच्या पोलिस अधीक्षकांना रात्रीच दिली आहे. त्याची त्यांनी चौकशी केली आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यातून काय निष्पन्न झाले आहे, याची माहिती घेण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे, असेही दमानिया यांनी सांगितले. यासंदर्भात बीडच्या पोलिस अधीक्षकांनी मला सांगितले आहे की, त्याचे कन्फर्मेशन झालेले नाही. त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर झाला का नाही, याला पोलिस प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकलेला नाही, त्यामुळे दमानिया यांचे आरोप किती तथ्य आहेत, हे चौकशीतूनच पुढे येणार आहे.
तसेच याविषयी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना तीन आरोपींची हत्या झाली आहे याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का हे विचारण्यात आले त्यावरती त्यांनी सांगितले की याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही तसेच पोलिसांकडूनही कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही.
पोलिसांचे अजून या सर्व गोष्टींची चौकशी करण्याचे काम चालू आहे त्यामुळे आता ही माहिती कितपत खरी आहे हे मलाही माहिती नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
अशाच नावीन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Exit mobile version