महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयामुळे सरकारमधील सत्तावाटपाची पूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत. 5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे नव्या समीकरणांवर आधारित सत्तावाटपाचे सूत्र ठरावे, यासाठी भाजपांर्गत दबाव असल्याने महत्त्वाच्या खात्यांवरील दावा सोडण्यास पक्षातील वरिष्ठ नेते तयार नसल्याचे सांगितले जात होते. तर 14 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी उद्या हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती आहे. यात 35 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात कुणा-कुणाचा समावेश असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नमस्कार मी पिके भांडवलकर हल्लाबोल या चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
चला तर पाहूया आता कुणाकडे किती मंत्रिपदे असणार आहेत
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
गृह, अर्थ, नगरविकास, महसूल आदी महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा असल्याने चर्चा करूनही तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नव्हते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर खातेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे 21 खाती, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रिपदं तर शिवसेना शिंदे गटाकडे 13 खाती असणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप 17, तर शिवसेना 11, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
अर्थखातं आणि गृहखात्याबाबत भाजप पक्षाने काय निर्णय घेतला आहे? ते आपण पाहणार आहोत.
गृहखात्यावरून कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कळविण्यात आला असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना अर्थखाते देण्यावरूनही भाजपमध्ये मतभेद होते. मात्र चर्चेअंती अजित पवार यांच्या अर्थखाते सांभाळण्याच्या अनुभवावरून त्यांच्याकडेच तिजोरीच्या चाव्या देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहखातं भाजप स्वत: कडे ठेवणार आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागल्याने शिवसेनेने वारंवार गृहमंत्रिपद आपल्याकडे असावं, अशी मागणी केली होती. मात्र गृहमंत्रीपद हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी भाजपने महसूल खात्याची ऑफर दिलेली होती. मात्र ती ऑफर नाकारून नगरविकास खाते मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. अखेर भाजपने नगरविकास सोडण्यासाठी शिंदे यांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता महसूल खात्यासारखे वजनदार खाते भाजपकडे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता पाहूया भाजपकडे कोणती खाती राहणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:कडे गृहखाते ठेवणार आहेत. महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, आदिवासी विकास, पर्यटन, वने अशी महत्वाची खाती भाजपकडे असणार आहेत.
चला तर पाहूया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे कोणती खाती भेटणार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे शिंदे सरकारमध्ये जी खाती होती, तीच खाती पुन्हा फडणवीस यांच्या सरकारमध्ये कायम राहणार आहेत. वित्त, सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन, क्रीडा आणि युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी महत्त्वाती खाती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असतील.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कोणती खातीअसणार आहेत?
नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, उत्पादन शुल्क, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय अशी खाती शिंदे यांच्याकडे असतील.