1. बीड जिल्ह्यानंतर आता परभणी हे शहर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठा राडा सुरू आहे. एकीकडे जाळपोळ, दगडफेक आणि त्यानंतर आता पोलीस कारवाईमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतं आहे.
पोलिसांच्या कारवाईमध्ये एका दलित चळवळीत कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
 आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतं आहे.
चला तर पाहूया परभणी या शहरांमध्ये नक्की काय प्रकार घडला होता आणि आता प्रकरण उघडकीस आल्यानंतर का खळबळ उडाली आहे?
नमस्कार मी पिके भांडवलकर हल्लाबोल या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
आज आपण पाहणार आहोत परभणी येथे नक्की काय झाले होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत नक्की काय घडले आणि सोमनाथ सूर्यवंशी हे नक्की कोण आहेत.
परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एका संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना झाली होती.
 त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती.
यावेळी जाळफोळीच्या घटना समोर आल्या. यामुळे परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं.
 काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. यावेळी एक घटना घडली.
सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता.
परंतु ज्या वेळेस पोस्टमार्टम करण्यात आलं त्यावेळेस रिपोर्ट आले की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा शरीरावरील अति जखमांमुळे झाला आहे.
हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून आता संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे पोलिसांच्या काय रे शैलीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे.
तसेच व्यवस्थेने सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली असा देखील आरोप केला जात आहे.
या सर्व प्रकारानंतर प्रकाश आंबेडकर यांनी परभणी प्रकरणाची दखल घेतली.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम हा ऑन कॅमेरा करावे अशी मागणी केली होती.
त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम कॅमेरा करण्यात आला आणि त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा हार्ट अटॅक नाही तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आले.
चला तर पाहूया सोमनाथ सूर्यवंशी कोण होते?.
सोमनाथ सूर्यवंशी हे पुणे येथील  भोसरी येथील रहिवासी होते.
ते एलएलबी च्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होते.
त्यांचे वय ३५ वर्ष एवढे होते.
सध्या एलएलबी च्या परीक्षा चालू असल्यामुळे ते परीक्षा देण्यासाठी परभणी येथे आले होते कारण त्यांचे रेल्वेचे ऍडमिशन हे परभणी या ठिकाणी होते.
त्यावेळी परभणी येथे आंदोलन चालू होते या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे देखील सहभागी झाले होते.
आणि त्याचवेळी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी तेथून उचलले.
पोलीस कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
आता या सर्व गोष्टींची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांना मी न्याय मिळवून देऊ त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटला आहे.
तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना जामीन अर्ज मंजूर झाला होता तरी देखील त्यांची न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला शिवाय सोमनाथ सूर्यवंशी हे देखील वकिलीचे शिक्षण घेत होते त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणारच तरुणच न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो हे अजून गंभीर बाब आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच आता सुषमा अंधारे यांनी देखील पोलिसांवरती आरोप केले आहेत .
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.
 पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली.
त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे खुणा दिसून येत होत्या.
तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला आहे.
 पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, स्थानिक गुन्हे शाखेचे गोरगांड या तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करुन स्वतंत्र चौकशी करण्यात यावी
तसे केले नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन बसावे लागेल, असा इशाराही सुषमा अंधारे यांच्याकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणांमध्ये पुढे काय होणार आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला या सर्व गोष्टी समोर येतच आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू  खरच कोणत्या कारणामुळे झाला असावा आणि त्यांच्या मृत्यूला जर पोलीस प्रशासन जबाबदार असेल तर त्यांना कोणती शिक्षा देण्यात यावी हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *