Site icon

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घटनाक्रम


सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहेत . कारण केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्दयीपणे हत्त्या करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांचे हत्या केल्याचे फोटो इंस्टाग्राम वरती व्हायरल होत आहेत.
त्या फोटोमध्ये असे दिसत आहे की संतोष देशमुख यांना खूप निर्दयपणे मारण्यात आले आहे.
चला तर पाहूया संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली आणि यांच्या हत्येमागे कोण मास्टरमाईंड आहे.
संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे सोमवारी नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता त्यांच्या टाटा इंडिगो गाडीतून केजहून मस्साजोगकडे जात होते.
 त्यावेळी शिवराज देशमुख हे ड्रायव्हिंग करीत होते.
 वाटेत डोणगाव फाट्याजवळच्या टोलनाक्याजवळ एक काळ्या रंगाची स्कार्पिओ त्यांच्या गाडीला आडवी लावण्यात आली.
त्या गाडीतून सहा लोक खाली उतरले.
त्यापैकी एकाने दरवाजाची काच दगडाने फोडली.
 गाडीत पाहिले आणि दुसऱ्या बाजुला जाऊन संतोष देशमुख यांच्याकडील दरवाजा उघडून त्यांना बाहेर ओढले.
 त्याचठिकाणी त्यांना लाकडी काठीने मारहाण केली आणि सोबत आणलेल्या स्कार्पिओमध्ये त्यांना बळजबरीने बसवून केजच्या दिशेने निघून गेले.
 हा सर्व खेळ अवघ्या चार मिनिटात झाला. अपहरण करून भरधाव वेगाने पुन्हा काळा रंगाची स्कार्पिओ केज च्या दिशेने जाताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
त्यानंतर मारहाण करणाऱ्या मुलांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे.
त्यानंतर त्यांचे काही फोटो इंस्टाग्राम वर व्हायरल झाले त्या फोटोमध्ये असे दिसत आहे की  संतोष देशमुख यांच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक ठेवली नाही. शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटले आहेत. फायटरने मारहाण केलेली आहे. लायटरने डोळ्याला चटके दिले आहेत.
शिवराज देशमुख हे पोलीस स्टेशनला आपला भावाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवायला गेले होते परंतु पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 45 मिनिटे बसून ठेवण्यात आले कारण पोलीस स्टेशनमध्ये जे तक्रार नोंदवून घेतात ते 45 मिनिटे पोलीस स्टेशनच्या बाहेर होते.
 ते आल्यावर तीन तास झाले तरी त्याने फिर्याद घेतलीच नाही. यादरम्यान संतोषचा चुलत भाऊ आणि विष्णू चाटे यांचे ३६ कॉल झाले होते.
 यामधील ३५ कॉल हे संतोषच्या भावाने विष्णू चाटे यांना लावले होते.
प्रत्येक फोनला ते दहा मिनिटं थांबा त्यांना बोलावून घेतो केस काही करू नका असं सांगत होते, तोपर्यंत इकडचे लोक बोलले केसचं नंतर पाहू पण तुम्ही त्यांना बोलावून घ्या. पोलिसांचं त्यावेळी पहिलं काम हे होतं की विष्णू चाटे याला पकडून तुझ्या पोरांना सांग आणि संतोषला इकडे घेऊन या. आपण समोरासमोर बसू आणि तडजोड करू आणि विषय संपवू, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असे  देखील सांगण्यात येत आहे.
दरम्यान सायंकाळच्या वेळी संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूरघाट रस्त्यावर दहीटना फाटा येथे आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व शास्त्राचे वार होते.
एवढे सगळे होऊन देखील  आरोपींना तीन दिवस अटक करण्यात आली नव्हती.
संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली होती?
6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारण्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावरील सुरक्षारक्षक मस्सजोग येथील असल्याने संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
६ डिसेंबर रोजी शुक्रवारी झालेल्या हाणामारीमध्ये आरोपींमधील प्रतिक घुले याच्या तोंडात कोणीतरी मारली होती. याचा व्हिडीओ कोणीतरी पोरांनी व्हायरल केला.
आमचा फोटो व्हायरल केला. त्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला. तिथले लोक म्हणत होते की सरपंचाला उघडनागडं करू याचाही आम्ही रील करू, उचलून नेलं होतं तर तसं करायचं. पण तसं काही केलं गेलं नाही.  त्या गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात होता.
  त्यामुळेच त्यांनी सोमवारी दुपारी देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकून दिला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने आणि रस्ता रोको करण्यात आला होता.
अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केले होते.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
जरांगे यांनीही आंदोलकांची भेट घेतली. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हेही आंदोलनस्थळी पोहोचले. आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता.
बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांना तातडीने निलंबित केले. पाच तासानंतर पोलीस प्रशासन आणि जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर  मागे घेण्यात आले.
 त्यानंतर देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान या प्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार आणि भाजपा नेते सुरेश धस यांनी हत्येप्रकरणी मोठा दावा केला आहे.
 संतोष देशमुखांना आरोपींनी सलग तीन तास मारहाण केल्याचा मोठा दावा ‘मुंबई तक’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
तसेच तीन तास मारहाण पोलिस स्टेशनच्या पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुखांना ज्यावेळी आरोपींनी गाडीत उचलून नेले त्यानंतर त्यांनी सलग तीन तास मारहाण केली. ही मारहाण पोलीस स्टेशनच्या पाच किलोमीटर  अंतरावर झाली आहे.
पोलिसांचे काम होते की, पोलीस दल बोलून पाच किमीमध्ये सगळीकडे पोलिसांच्या गाड्या पाठवाव्यात. दोन स्कॉर्पिओ आहेत तिथे पाठवल्या पाहिजे होत्या. पोलिसांनी तीन तास कोणतेही पाऊल उचलले नाही. दैठणा नावाचे गाव आहे जे बॉर्डवर आहे.
तसेच अंगाचा थरकाप उडेल असा मृत्यू संतोष देशमुख यांच्या नशिबी आला. हल्लेखोरांनी त्यांची बोटं मोडली, पाठ काळनिळी होईपर्यंत मारहाण,शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा  धक्कादायक खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. या हत्येमागचं कारण आणि पोलीस यंत्रणेने केलेला हलगर्जीपणाही त्यांनी उजेडात आणला.
संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? हत्यामागे कोण आहेत? धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तियाचं नाव का समोर येत आहे याबाबत सविस्तरपणे धस यांनी सांगितलं आहे.
तसेच सुरेश धस यांनी स्वतः त्या गावात जाऊन संतोष देशमुख याबद्दल माहिती घेतली आहे.
त्यावेळी सुरेश धस यांनी सांगितले की संतोष देशमुख हे सरपंच कसे झाले होते.
कारण संतोष देशमुख हे मूळचे मस्साजोग नसून ते बार्शीचे होते.
 संतोष देशमुख हे त्याच्या आजोबांकडे राहत होते. म्हणजेच मस्साजोग मध्ये त्यांच्या मामाकडे ते लहानपणापासून होते त्यांच्या आईला बार्शीकडे दिले होते.
तिकडे त्यांना फक्त पाच एकर जमीन होती त्यामुळे संतोष देशमुख यांच्या आजोबांनी त्यांना माघारी आणलं तेव्हापासून संतोष देशमुख हे लहानाचा मोठा मस्साजोग येथे झाले.
त्यानंतर संतोष देशमुख हे जनतेतून पहिल्यांदा सरपंच झाले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी कायदा बदलला देवेंद्र फडवणीस यांनी जनतेतून सरपंच कायदा बनवला होता तो उद्धव ठाकरे यांनी बदलला होता तेव्हा सदस्य मधूनही संतोष देशमुख हे सरपंच झाले.
त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडवणीस यांची सत्ता आल्यानंतर पुन्हा सरपंच होण्याचा कायदा बदलला त्यामध्येही संतोष हे पुन्हा एकदा जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले.
संतोष देशमुख हे सरपंच असताना मस्साजोग या गावाने स्वच्छता झाडे लावण्याचे दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले होते.
त्यानंतर केज या तालुक्यातील मस्साजोग येथे हवा जास्त प्रमाणात असल्यामुळे आवादा कंपनी, ऑटो पॉवर कंपनी अशा वेगवेगळ्या कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आल्या.
अशा कंपन्या आष्टी तालुक्यात 2011 ते 2012 दरम्यान आल्या आहेत परंतु आष्टी तालुक्यात असला काही प्रकार झाला नाही परंतु केज तालुका हा परळी जवळ येत आहे त्यामुळे असले प्रकार घडत असल्याचं सुरेश धस यांनी सांगितले आहे.
तसेच संतोष देशमुख यांची हत्या पोलीस स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटर रेडीयस मध्ये करण्यात आले आहे त्यावेळी पोलिसांनी तीन तास वाया न घालवता जर फिर्याद घेतली असती तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती.
तसेच या घटनेतील आरोपी प्रतीक घुले यांनी कबुली दिली आहे की संतोष देशमुख याचा जीव जात नव्हता म्हणून मी डब्ल्यूडब्ल्यूई सारखे गुडघे उचलून देशमुख यांच्या छातीवर मारत बसलो होतो.
तर आता या घटनेला राजकीय वळण देखील लागत आहे कारण आवदा कंपनीने हत्या झाल्यावर तक्रार दिली आहे की आम्हाला खंडणी मागण्यात आली होती या प्रकारनामध्ये वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले.
तर वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात.
तर धनंजय मुंडे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये अशी देखील मागणी होऊ लागली आहे.
तर आता या सर्व प्रकरणाला कोणते वळण लागणार आहे आणि यामध्ये आता आणखी जास्त लोकांची नावे समोर येऊ शकतात.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते संतोष देशमुख यांच्या हत्यारांना कोणती शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version