Site icon

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा नेमका वाद काय ?


सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा नेमका वाद काय ?
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या कऱण्यात आहे.
हत्या झाल्यानंतर नंतर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. आरोपी मोकाट फिरत होते. त्यानंतर हे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले. सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी वाल्मीक कराड याचा या हत्येमध्ये हात आहे असा आरोप केला. कारण संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे सांगत होते की ते मस्साजोग येथे जाऊन आले तर तेथील लोक वाल्मीक कराड याचे नाव घेत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा  व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाला.
त्यानंतर सुरेश धस यांनी वेळोवेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. या मागणीला नंतर जोर वाढू लागला. विरोधी पक्ष नेतेही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करू लागले. यामुळे सर्वांना आता असा प्रश्न पडला आहे की सुरेश देशमुख हे वारंवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी का करत आहे?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात  नेमका वाद काय आहे?
चला तर पाहूया सुरेश धस यांची राजकीय कारकीर्द आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमका वाद कधी निर्माण झाला?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे एका छोट्याशा कुटुंबात सुरेश धस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात राजकारणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात सुरेश धस यांनी डाव्या काँगेस पक्षाचे नेते साहेबराव दरेकर यांच्याबरोबर काम केलं. १९९५ मध्ये दरेकर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे भाजप पक्षात कार्यरत होते. १९९७ मध्ये सुरेश धस यांनी काँगेस पक्षाला राम राम करत भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांनतर गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर संपर्क वाढवला. १९९९ च्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले.  १९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपाची स्थिती कमकुवत झाली होती. दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील प्रभाव कमी झाला होता. तर२००४ मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बीडच्या राजकारणात लोकप्रियता मिळवली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकी आधी आमदार सुरेश धस यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या संपर्कात आले. २०१३ मध्ये धनंजय मुंडेही भाजपामधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२०१४ मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला होता. विशेष बाब म्हणजे, या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपलेच प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं.
 या सर्व घडामोडीदरम्यान  आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. डिसेंबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे बीडमधील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस यांनी स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवले आणि पुन्हा एकदा भाजपाबरोबर जवळीक वाढण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. त्यावेळी सुरेश धस म्हणाले होते की, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये काम करताना मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत कामे केली. कारण त्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. यामुळे धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचे राजकीय वैर निर्माण झाले. त्यांनतर २०१८ मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी  सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली.  त्यानंतर 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत पडली आणि धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली. त्यामुळे अजितदादा सोबत धनंजय मुंडे हे देखील महायुती सोबत आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार  गट आणि भाजप पक्ष एकत्र आले त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील बऱ्यापैकी कमी झाला. धनंजय मुंडे पुन्हा महायुतीत आल्यामुळे सुरेश धस हे एकाकी पडले.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यात जाहीरपणे नकार दिला. पंकजा मुंडे यांचा पराभव लोकसभेमध्ये झाला या पराभवामागेही हे एक मुख्य कारण होतं असं बोललं जातं.  त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने आष्टी विधानसभा मतदारसंघ येथे सुरेश धस यांना त्यावेळी मात्र सुरेश धस यांचा पराभव करण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अपक्ष उमेदवाराला बळ दिले. या सर्व गोष्टी सुरेश धस यांना माहीत होत्या. परंतु सुरेश धस यांचा तब्बल 72 हजार एवढ्या मतांनी विजय झाला. त्यामुळे सुरेश धस हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. परंतु सुरेश धस निवडून आले त्या दिवशीपासून त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले. तर सुरेश धसे पाच वेळेस आमदार होऊ नये त्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. आणि त्याच दरम्यान बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. याबद्दलची तक्रार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाण्यात केली होती परंतु यावरती कोणतेही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियामध्ये वाऱ्यासारखे पसरले. तसेच हे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले आणि या प्रकरणामध्ये वाल्मीक कराड चे  नाव समोर येताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावती टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा इथपर्यंत गेले. परंतु अजून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेलेला नाही.

Exit mobile version