सोलापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु २०२४ या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेला सोलापूर मतदारसंघ येथे काँग्रेसने खिंडार पडले आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे विरोधात राम सातपुते अशी लढत होती या लढत मध्ये प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली आहे. सोलापूर मध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ येतात .चला तर पाहुयात ते विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत.करमळा , माढा , माळशिरस , सांगोला , पंढरपूर , सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट , मोहोळ आणि बार्शी या ११ विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश सोलापूर मध्ये येतो.
सोलापूर मध्ये पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे करमाळा करमाळाचे विद्यमान आमदार आहेत. संजय मामा शिंदे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत. २०१९ मध्ये संजय मामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती .परंतु ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२४ मध्ये करमाळा या विधानसभेची जागा कोणाला सुटणार यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत. रश्मी बागल ,संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. तर महाविकास आघाडी कडून नारायण पाटील यांची जागा फिक्स समजली जाते . कारण त्यांना मोहिते पाटील यांचा सपोर्ट मिळेल अशा चर्चा रंगल्या आहेत.
दुसरा मतदारसंघ आहे माढा
माढा येथे बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. बबन दादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. तसेच बबनदादा शिंदे यांना मोहिते पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाते. तर लोकसभा निवडणुकीमध्ये याच माढा मधून मोहिते पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना ५००० हून जास्त लीड मिळाले आहे. त्यामुळे आता माढामध्ये एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे माढा आणि बबन दादा यांना पाडा. बबन दादा शिंदे हे मागील सहा टर्म चे आमदार आहेत. परंतु २०२४ मध्ये त्यांची आमदारकी आता धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बबनदादा शिंदे हे या वेळेची विधानसभा निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा चालू आहेत. परंतु ते आमदारकीसाठी स्वतः उभे नाही राहिले तरीही त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना उभे करू शकतात. तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन उमेदवार सध्या इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई नगराध्यक्ष मीनल साठे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे यांची नाव चर्चेत आले आहे.परंतु आता शरद पवार कोणाला तिकीट देणार यावरती सर्वकाही अवलंबून राहील .
तिसरा मतदार संघ येतो तो माळशिरस
माळशिरस येथे विद्यमान आमदार राम सातपुते हे आहेत. राम सातपुते हे भाजपचे उमेदवार आहेत. तसे पाहिले तर माळशिरस हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. मोहिते पाटील येथे त्यांचे डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असे बोलले जाते. २०१९ मध्ये राम सातपुते हे भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून उत्तमराव जानकर यांच्या दोघांमध्ये लढत होती. परंतु राम सातपुते यांनी येथे बाजी मारली होती. परंतु २०२४मध्ये हे सर्व काही वेगळे असणार आहे. कारण राम सातपुते हे सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे होते. परंतु राम सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागला त्याचं कारण मी असा आहे की ज्यामुळे ते पाटलांनी त्यांना उभे केले होते तेच मोहिते पाटलांनी त्यांची विरोधात काम करायला चालू केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा उत्तम जानकर यांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळेल असं बोललं जात आहे फक्त आता प्रश्न राहतो राम सातपुते लोकसभा पराभव नंतर पुन्हा एकदा ते विधानसभेला उभे राहणार का?
चौथा मतदारसंघ आहे तो सांगोला
शहाजी बापू पाटील सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत . २०१९मध्ये गणपतराव देशमुख यांची नातू अनिकेत देशमुख यांच्यासोबत लढत झाली होती. तसे पहिले तर गणपतराव देशमुख यांचा साठ वर्षापासून इथे वर्चस्व आहे. परंतु २०१९ मध्ये गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले व त्यांनी त्यांचा नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु याची संधी शहाजी बापू पाटील यांना मिळाली आणि शहाजी बापू पाटील हे 2019 मध्ये विजयी झाले. शहाजी बापू पाटील अवघ्या ६७४ मतांनी विजयी झाले होते. परंतु २०२४ मध्ये वारं थोडस उलट केलेले दिसतं शहाजी बापूंचे विरोधात वार आहे असं बोललं जाते. कारण त्यांनी शिवसेनेत बंड केला आहे महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत.
पाचवा मतदार संघ आहे पंढरपूर
पंढरपूर येथे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत. खरंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये भारत भालके हे आमदार झाले होते. परंतु त्यांचे काही कारणास्तव निधन झाले. त्यामुळे पुन्हा एकदा पोट निवडणूक लढवण्यात आली आणि या पोटनिवडणुकीत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ केली आणि भाजप नेत्यांचे विरोधात समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवले. परंतु पोटनिवडणुकीमध्ये समाधान अवतडे यांचा विजय झाला त्यामुळे पंढरपूर हा बालेकिल्ला आता भाजपकडे गेला. भारत भालके हे सलग तीन टर्म चे आमदार राहिलेले होते. परंतु आता २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये थोडेसे वेगळे गणित पाहायला भेटलं. कारण इथे प्रणिती शिंदे यांना तब्बल 45 हजाराचे निर्णय मतदान मिळाले आहे . त्यामुळे समाधान आवताडे आणि भाजप यांची धाकधूक वाढत चालले आहे. तर ह्या वेळेस महायुतीकडून आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे उत्सुक असल्याचे बोलले जाते. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणूक साठी इच्छुक असल्याचे बोलले जात. आता मधून कोणाला उमेदवारी भेटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूर मध्य
सोलापूर मध्य येथे विद्यमान आमदार प्रणिती शिंदे ह्या होत्या. परंतु प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे. आणि आता त्यांची खासदार पदी निवड झाली आहे. मागील तीन टर्म सलग प्रणिती शिंदे या जिंकून आलेले आहेत आणि त्या तेथील आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा सोलापूर मध्य हा बालेकिल्ला मानला जातो. प्रणिती शिंदे ह्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत. परंतु आता प्रणिती शिंदे यांची खासदार पदी निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये इथे कोणाला उमेदवारी भेटते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर दक्षिण
सोलापूर दक्षिण येथे सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. सुभाष देशमुख हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत. सुभाष देशमुख हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिले आहे. आता २०२४ लोकसभा निवडणूक पाहता भाजप विरोधी वातावरण दिसले होते. त्यामुळे आता सुभाष देशमुख हे पुन्हा तिसरी टर्म जिंकणार का असा प्रश्न आहे. हे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला समजेल.
आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर उत्तर
सोलापूर उत्तर येथे विजयकुमार देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. विजयकुमार देशमुख हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत. सलग तीन टर्म विजयकुमार देशमुख हे सोलापूर उत्तर येथे आमदार राहिले आहे. त्यामुळे सोलापूर उत्तर हे भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही विजयकुमार देशमुख हे आता चौथी जिंकणार का असा प्रश्न आहे. कारण नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण वार हे भाजप विरोधात दिसत होते. त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकांवरती होणार का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे.
नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोहोळ
मोहोळ येथे विद्यमान आमदार आहेत यशवंत माने, यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाचे उमेदवार आहेत. 2019 मध्ये यशवंत माने यांनी बाजी मारली होती. परंतु आत्ताची लोकसभा निवडणूक निकाल पाहता महायुतीवरती मतदार नाराज आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा यशवंत माने यांची वर्णी लागणार का असा प्रश्न आहे. तसेच महायुतीमधील आमदारांची धाकधूक होईल चांगलीच वाढली आहे. २०२३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस फुटींमुळे सध्या सहानुभूतीची वारे हे शरद पवार यांच्या बाजूने आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळतात. यावरती बरेच उमेदवारांची आमदारकी अवलंबून असणार आहे.
दहावा मतदार संघ आहे तो म्हणजे बार्शी
बार्शी येथे राजेंद्र राऊत हे विद्यमान आमदार आहेत. राजेंद्र राऊत यांनी २०१९ साली अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते ती निवडणूक जिंकले होते. परंतु राजेंद्र राऊत हे सध्या भाजप यांना पाठिंबा देत आहे.
आता पाहुयात अकरावा मतदार संघ तो म्हणजे अक्कलकोट
अक्कलकोट येथे विद्यमान आमदार आहेत सचिन शेट्टी. सचिन शेट्टी हे भाजप पक्षाचे उमेदवार आहेत.सचिन शेट्टी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचा ३६ हजार एवढ्या मतांनी पराभव केला होता. २०१९मध्ये मोदी लाट होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भाजपच्या आमदारांचा विजय झाला होता. परंतु २०२४ लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता मोदींविरोधात वारे फिरलेले दिसते. त्यामुळे आता भाजपचे आमदार यांची ह्या विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच धाकधूक वाढलेली आहे.
तर मंडळी एकंदर सोलापूर जिल्ह्याचा हा आहे लेखाजोखा.
तर मंडळी सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.