Site icon

हिंगोली जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024


आज आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्कीच चाललय काय? हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी.  हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे 1962 मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांनी मिळविला होता.  हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक काळ सत्ता भोगली आहे.  या मतदार संघात आजपर्यंत गोरेगावकरांच वर्चस्व राहिले आहे.
1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे या मतदारसंघाचे आमदार होते. मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला.  हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत.  या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.  जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा बोलबोला होता, तर वसमतमध्ये राष्ट्रवादीची चलती होती.  पण 2014 साली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याचं बघायला मिळालं. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 1 जागा मिळाली.
आता पाहुयात सर्वात पहिली विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे हिंगोली
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघ क्रमांक ९४  आहे. हिंगोली मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. सेनगांव तालुका आणि २. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा, नारसी, हिंगोली ही महसूल मंडळे आणि हिंगोली नगरपालिका यांचा समावेश होतो.  हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे तानाजी सखारामजी मुटकुळे हे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हिंगोली या मतदारसंघात 1962 साली साली पहिल्यांदा काँग्रेसचे नारायणराव लिंबाजीराव यांनी विजय मिळवला.  त्यानंतर इथे अनेकवेळा आलटून पालटून कॉंग्रेसची सत्ता राहिली आहे.  पुढे 1999 ते 2014 या काळापर्यंत काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सतत विजयश्री प्राप्त केली आहे.  मात्र २०१९ मध्ये या विधानसभेला भाजपच्या तानाजी मुटकुळे यांनी त्यांचा पराभव करून इथला आमदार होण्याचा मान मिळवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे मुटकुळे तानाजी सखारामजी 95,318 मते मिळवून विजयी झाले. तर काँग्रेस पक्षाचे पाटील भाऊराव बाबुराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. हिंगोली विधानसभा बद्दल बोलायचं झालं तर हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता . तर आता 2014 आणि 2019 मध्ये येथे भाजपचे आमदार निवडून येत आहेत त्यामुळे 2024 मध्ये काँग्रेस आपला बालेकिल्ला मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन तसेच महाविकास आघाडी कडून आता इथे नवीन चेहरा देण्याचाही प्रयत्न केला जाईल त्यामुळे आता इथे कोणाला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर माहिती कडून सलग दोन टर्म आमदार राहिलेले तानाजी मुटकुळे यांनाच 2024 मध्ये उमेदवारी भेटेल असे चर्चा रंगले आहेत  2014 आणि 2019 प्रमाणे येथे तानाजी मुटकुळे यांचेच पारडे जड राहील असे दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दुसरा मतदार संघ तो म्हणजे कळमनुरी
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघ  क्रमांक ९३ आहे. कळमनुरी मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. कळमनुरी तालुका २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील औंढा नागनाथ आणि येहळेगांव ही महसूल मंडळे आणि ३. हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे संतोष लक्ष्मणराव बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच कॉंग्रेसच्या ताब्यात होता. इथे मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजाचे लोक जास्त आहेत त्यांच्याच मतांवर इथले राजकारण फिरत असते. मुस्लीम मतदारांच्या जोरावर कॉंग्रेसने 4 वेळा, तर आदिवासी लोकांच्या मतांवर माकपचे विठ्ठल नाईक यांनी 4 वेळा विजय मिळवला आहे.  मात्र गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेना इथे आपला जोर लावू पाहत असल्याचे दिसत आहे.  2019 मध्ये येथे शिवसेनेला यश मिळाले आणि शिवसेनेचे संतोष बांगर हे विजयी झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे बांगर संतोष लक्ष्मणराव 82,515 मते मिळवून विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. शिवसेना पक्ष फुटी नंतर संतोष बांगर यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ देण्याचे ठरवले.  त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून संतोष बांगर तर महाविकास आघाडी कडून अजून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरलेलं नाही त्यामुळे येथे संतोष बांगर विरोधात महाविकास आघाडी कोणता नवीन चेहरा इथे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे  तसेच संतोष बांगर हे मे महिन्यामध्ये जास्त चर्चेत आले होते कारण त्यांच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावर केला होता.
आता पाहुयात हिंगोली जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वसमत
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. वसमत विधानसभा मतदारसंघ क्रमांक ९२ आहे.  वसमत मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. वसमत तालुका आणि २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील जवळाबाजार आणि साळना ही महसूल मंडळे समावेश होतो.  वसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे हे बसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा मतदारसंघ मुख्यत्वे शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे.   एकेकाळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र 2004 आणि 2009 साली राष्ट्रवादीने आपला झेंडा इथे फडकवला.  मात्र त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा शिवसेनेन इथे विजय प्राप्त केला. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्रकांत नवखरे यांना उमेदवारी देऊन वसमत हा विधानसभा मतदारसंघ मिळवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे आणि अपक्ष अॅड. शिवाजी मुंजाजीराव जाधव यांच्यात चुरशीची लढत झाली होती.  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रमाकांत नवघरे ७५,३२१ मतं मिळवून विजयी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर रमाकांत नवघरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना साथ दिली.  त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे रमाकांत नवघरे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून अजून उमेदवार फिक्स झाला नाहीये. तरीही आता महाविकास आघाडी इथे कोणता नवा चेहरा आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये हे तिकीट कोणाला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण वसमत हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु 2004 पासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विजय मिळवलेला आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाला भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण जिंकून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Exit mobile version