Site icon

4 दिवस काम, 3 दिवस आराम. शासनाचा नवीन नियम


4 दिवस काम, 3 दिवस आराम. शासनाचा नवीन नियम
गेल्या काही दिवसात सर्वाधिक चर्चा झालेला विषय कोणता असेल तर तो म्हणजे कामाचे तास .
नवीन कामगार संहितेनुसार आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस विश्रांती असू शकते, असे धोरण सरकार आणण्याच्या तयारीत आहे
लार्सन अॅण्ड टूब्रोचे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यन यांनी आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.
तसेच रविवारी देखील काम करण्याचा सल्ला दिला होता.
सुट्टीच्या दिवशी कितीवेळ बायकोकडे पाहत बसणार असे वक्तव्य केले होते. यामुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते.
तर दुसरीकडे कामाचं प्रेशर जास्त असल्यामुळे अति ताण-तणावामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
तर आता एक फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा आणि योजना सादर केल्या जातील.
यात कामाच्या  संदर्भातील एक मोठा बदल होण्याची शक्यता वक्त केली जात आहे.
चला तर पाहूया सरकार नक्की कामाचे आठवड्यातील चार दिवस करणार आहेत का?
जर आठवड्यातील चार दिवस काम करणार असू तर दिवसाला किती तास काम करावे लागणार आहे?
त्यामुळे आता कंपन्यांसाठी कोणते नवीन नियम लागू होणार आहेत?
  • या सर्व प्रश्नांची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओ मधून पाहूया.
चला तर मुद्द्याचं बोलू
मुद्दा क्रमांक १) आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करावे लागणार असा नवा नियम येणार आहे का?
 इन्फोसिसचे सह-संस्थापक नायराण मूर्ती यांनी  70 तास काम करण्याबद्दल बोलले होते.
आठवड्याला कामाचे तास किती हवेत यावरून सर्वजण चर्चा करू लागले आहेत.
 येत्या 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक नव्या घोषणा आणि योजना केल्या जातील. यात कामाच्या तासासंदर्भातील एक मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामाचे तास किती असावेत यावर फक्त भारतात नाही तर अन्य देशात देखील चर्चा होत असते.
 नारायणमूर्ती यांच्या मते युवकांनी दररोज 12 तास काम केले पाहिजे.
तर सुब्रह्मण्यन यांनी रविवारी सुट्टी न घेता काम केले पाहिजे असा सल्ला दिला.
 यावरून दोघांवर सोशल मीडियावर टीका होत होती.
 या सर्व पार्श्वभूमीवर भारतात आठवड्यातील 4 दिवस कामाच्या वेळापत्रकावर चर्चा सुरू झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आगामी अर्थसंकल्पात टप्प्याटप्प्याने कामगार संहिता लागू करण्याची योजना जाहीर करू शकतात.
आगामी अर्थसंकल्पात मोदी सरकार नवीन कामगार संहिता नियम लागू करण्याची घोषणा करेल, असा विश्वास अनेकांना आहे.
तसे झाल्यास देशात नवीन कामगार संहिता तीन टप्प्यांत लागू होईल.
केंद्राला असे वाटते की कामगार संहितेच्या नवीन धोरणांची एकाच वेळी अंमलबजावणी कंपन्यांसाठी अडचणीची बनू शकते. मालकांना पुरेसा वेळ देण्यासाठी तीन टप्प्यांत याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक २) आठवड्यातून जर चार दिवस काम करायचे असेल तर चार दिवस किती तास काम करावे लागणार?
 नवीन लेबर कोडमध्ये आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याची परवानगी भेटणार आहे.
परंतू रोजचे कामाचे तास वाढतील.
मग हे कामाचे तास दहा ते बारा असे असू शकतात.
तर 500 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात या नवीन लेबर कोडचे पालन केले पाहिजे असे सांगितले जाईल
तर 100 ते 500 कर्मचारी असलेल्या मध्यम स्तरावरील कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यात हे नियम लागू होतील.
त्यानंतर 100 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या छोट्या कंपन्या लेबर कोड लागू केले जातील.
या लहान कंपन्यांच्या मते नवीन कामगार संहिता लागू करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो.
देशातील उद्योगांमध्ये 85 टक्क्यांहून अधिक वाटा हा लघु उद्योगांचा आहे.
नवीन कामगार संहितेनुसार आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस विश्रांती असू शकते, असे सांगण्यात येते. कर्मचाऱ्यांसाठी वर्क-लाइफ समतोल निर्माण करण्याच्या उद्देशाने हे धोरण असल्याचे म्हटले आहे.
मात्र यामुळे दैनंदिन कामकाजाचे तास वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते कामाची तास वाढवले पाहिजे का? आणि कामासाठी चार दिवसांचा आठवडा पाहिजे?
याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version