नगर. प्रतिनिधी अशोक बडे
अहमदनगर शहर जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उद्या शहरात शिवस्वराज्य यात्रा आगमन करत आहे. ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची पेरणी म्हणावी लागेल. अहमदनगर शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांनाही जागा मिळण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनीही जोरदार तयारी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर हे सुद्धा तयारी करत आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे सुद्धा नगर शहरात केडर भक्कम असल्यामुळे ही जागा नेमकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला जाणार हे अजून ठरलेले नसले तरी इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. मात्र यात्रेच्या निमित्ताने ही जागा कोणाकडे जाईल याचे काहीसे चित्र स्पष्ट होईल. ठाकरे गटात इच्छुकांची संख्या पाच आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात इच्छुकांची संख्या तीन आहे. अशा राजकीय वातावरणातच माजी महापौर संदीप कोतकर यांनी मी निवडणूक लढवणारच अशी पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशच दिले असे म्हणले तर वावगे नाही.