ट्रॅक्टर अनुदान योजना 2025
आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून सुलभ पद्धतीने तसेच जलद गतीने शेती कार्य करता यावे तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव Tractor Subsidy In Maharashtra 2025 आहे.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 8 HP ते 70 HP ट्रॅक्टर च्या खरेदीसाठी 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 1.25 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
राज्यामधील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे ते वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती कार्य करत असतात.
पारंपरिक पद्धतीने शेती कार्याला जास्त वेळ लागतो व खूप अंग मेहनत करावी लागते यामध्ये शेतकऱ्यांना इजा देखील होत असते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यात मदत व्हावी व शेती कार्य जलद गतीने व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
चला तर पाहूया या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात पात्रता काय आहे आणि याचा फॉर्म कसा भरावा?
चला तर पाहू या योजनेचे उद्दिष्ट नेमके काय आहे?
राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांना शेती कार्यात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
शेतीची कामे जलद गतीने करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
चला तर पाहूया या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
चला तर पाहूया या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान किती आहे?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान म्हणजेच 1.25 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 40% टक्के म्हणजेच 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत 20 एचपी ते 40 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल.
जर ट्रॅक्टर 40 पेक्षा जास्त ते 70 एचपी पर्यंत असेल तर अनुदान हे 1 लाख 25 हजार रुपये असेल.
चला तर पाहूया या योजनेचा फायदा आणि पात्रता काय आहे?
राज्यातील शेतकरी शेतात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून जलद गतीने तसेच सोप्या पद्धतीने शेती कार्य करू शकतील.
शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक शेती करण्यासाठी आकर्षित होतील.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेती साठी स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असता कामा नये.
एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
जर अर्जदाराने एखाद्या घटकासाठी अर्ज केल्यास पुढील 10 वर्षे त्याला त्याच घटकासाठी अर्ज करता येणार नाही परंतु तो इतर घटकांसाठी अर्ज करू शकतो.
चला तर पाहूया आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात?
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
7/12 दाखला
8 अ दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
प्रतिज्ञा पत्र
चला तर पाहूया ऑफलाईन अर्ज कसा करायचा?
अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज कसा भरावा?
अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
ती वेबसाइट Maha-Dbt Farmer Tractor ही आहे.
होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
त्यांनतर अर्जदाराला आपला Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
त्यांनंतर अर्जदाराला होम पेज वर कृषी विभागात जावे लागेल व कृषी विभागात ट्रॅक्टर अनुदान योजना वर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुमची ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
तर मंडळी तुम्हाला देखील नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तूम्ही देखील या अनुदानाचा वापर करून घ्या.