Site icon

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Pandharpur Assembly Election


महाराष्ट्रातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान ते म्हणजे विठू माऊली. विठू माऊली म्हटलं की आठवतं ते म्हणजे पंढरपूर. पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ जसा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसाच हा विधानसभा मतदारसंघ राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. कारण पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाकडे शरद पवार यांची जास्तच लक्ष असते असे म्हणायला हरकत नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथे महाविकास आघाडीला चांगलं लीड मिळालेली दिसते. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये पंढरपूर येथे महाविकास आघाडी की महायुती कोण गुलाल उधळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
चला तर पाहूया पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की काय चाललंय? पंढरपूर विधानसभा मतदारसंघ  २५२ आहे.  पंढरपूर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, पंढरपूर ही महसूल मंडळे आणि पंढरपूर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पंढरपूर हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विजय मिळवला होता. भारत भालके यांना 89,787 मतं मिळाली होती, त्यांनी भाजपा उमेदवार सुधाकर परिचारक यांचा 13,361 मतांनी पराभव केला होता. सुधाकर परिचारक यांना 76,126 मतं मिळाली होती. पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर परिचारक आणि भालके ही दोन घराणे स्थानिक राजकारणात प्रमुख आहेत.
ते गेल्या तीन ते चार दशकांपासून येथे राजकारण करत आहेत. सुधारक परिचारक हे 1985 ते 2004 या कालावधीत पाच वेळा निवडून आले होते. परंतु 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली मात्र भारत भालके यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये भारत भालके यांनी काँग्रेस पक्षाचे शैलेंद्र परिचारक यांचा पराभव केला. 2019 मध्ये भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी भाजपकडून उभे असलेले सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. परंतु 2020 मध्ये सुधाकर परिचारक आणि विद्यमान आमदार भालके यांचे निधन झाले. त्यामुळे 2020 मध्ये पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे निधन झाले. त्यामुळे पोट निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झाला? परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्या विरोधात भाजपकडून समाधान अवताडे यांना तिकीट देण्यात आले. आणि या निवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप पक्षाचे कमल येते फुलले. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला येथे चांगलेच लीड मिळाले तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटील हे म्हाडा लोकसभा निवडणुकी मधून निवडून आले. भाजपात असलेल्या मोहिते पाटील यांनी अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली .त्यामुळे येथे लोकसभेला भाजप महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच संस्थेची लढत पाहायला मिळाली. . त्यामध्ये, धैर्यशील मोहिते पाटील यांना विजय झाला. धैर्यशील पाटील यांना पंढरपूर येथे 622,213 एवढे मते मिळाली. मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा 45,420 मतांनी पराभव केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाला. प्रणिती शिंदे यांनाही सोलापूर येथून चांगले लीड मिळाले. सोलापूर येथे प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा लोकसभा निवडणुकीला चांगलाच पराभव केला. त्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आणखीच वाढला. विश्वसाबरोबर येथे इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढली. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून अनेक नावांची चर्चा होताना दिसत आहेत.
तसेच विरोधी पक्षातील काही उमेदवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या प्रवेश करून निवडणूक लढवण्याची तयारी दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी तसेच तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्यासाठी मागणी केली आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे तसेच भगीरथ भालके हेही पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत तर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी माहिती कडून निवडणुकीसाठी तयारी केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना तिकीट भेटणार की प्रशांत परिचारक यांना संधी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. त्यामुळे येथे साखर सम्राट लोक जास्त आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर येथे महत्त्वाचा ठरतो. तसेच पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांमध्ये अभिजीत पाटील यांची भूमिका ही महत्त्वाची ठरते.
आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील हे महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्यांना आमदारकीसाठी उभे राहायचे असेल तर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसे पाहिले तर पंढरपूर येथे सध्या राजकीय वातावरण फारच गुंतागुंतीचे पाहायला भेटते. तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून पंढरपूर मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना ही जागा मिळेल तर महायुतीमधून विद्यमान आमदार भाजपचे असल्यामुळे येथून भाजप यांना ही जागा मिळेल. त्यामुळे आता येणारे आगामी विधानसभा निवडणुकी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. मंडळी असा आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ यांचा लेखाजोखा. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पंढरपूर येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.

Exit mobile version