Site icon

परभणी जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Parbhani District Assembly


आज आपण पाहणार आहोत परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे नक्की कसे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकरांचा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. या निवडणुकीत जाधव यांनी जानकरांचा तब्बल एक लाख ३४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध करीत परभणी सेनेचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.  भाजपचे आमदार असणाऱ्या जिंतूर, परतूर विधानसभा मतदारसंघातसुद्धा उद्धवसेनेच्या उमेदवारास मोठे मताधिक्य मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुना जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे परभणी.  परभणी हा निजामकालीन जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. नांदेडसारख्या जिल्ह्याचा परभणीच्या तुलनेत अधिक विकास झाला आहे.  परभणी जिल्ह्याला प्रबळ इच्छाशक्ती असलेले राजकारणी लाभलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची बकाल अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणारा जिल्हा अशी नवी ओळख तयार झाली आहे .शेती हा एकमेव व्यवसाय इथे आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हटलं जातं. सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक आपतीचं संकट येथे आहे.
एकनाथ शिंदे  यांनी बंड केल्यानंतर परभणी येथील आमदार आणि खासदार हे ठाकरे गटात राहिले आहेत याचाच फायदा यांना इथे झाला आहे. लोकसभेमध्ये परभणी येथून संजय जाधव हे विजय झाले आहेत. परभणी येथे संजय जाधव यांनी महायुतीचे महादेव जानकर आणि वंचित आघाडीचे पंजाबराव ढक यांचा पराभव केला. तसे पाहिले तर महादेव जानकर यांचा आणि परभणी असा काही संबंध नाही तरीही महायुतीने महादेव जानकर यांना परभणी मधून लोकसभेसाठी तिकीट दिले.  त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचे चांगलाच परिणाम दिसून येणार आहे. 2014 च्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.  परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये परभणी परतुर जिंतूर गंगाखेड पाथरी अशा विधानसभांचा समावेश होतो.
आता पाहुयात सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ
सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे गंगाखेड
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ  क्रमांक ९७ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. गंगाखेड, २. पालम आणि ३. पुर्णा या तालुक्यांचा समावेश होतो.  गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  परभणी जिल्ह्यातील हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे.  2009 पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता मात्र त्यानंतर तो सर्वसाधारण गटासाठी खुला करण्यात आला.  1995 पर्यत 4 वेळा निवडून येत शेकापने इथे आपली पकड मजबूत केले होती.  मात्र त्यानंतर 1995 साली अपक्ष उमेदवाराने हा विजय मिळवला.  तिथून या मतदारसंघाचे राजकारण पूर्णतः बदलले. 2014 साली रत्नाकर गुट्टे, मधुसूदन केंद्रे आणि सीताराम घनदाट असे तीन श्रीमंत दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे निवडून आले होते.
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी, बसपाचे देवराव खंदारे, मनसेचे विठ्ठलराव जवादे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे व इतर अपक्ष अशे बौर्ण्गी अशी लढत होती. यामध्ये रासप चे  रत्नाकर गुट्टे यांनी बाजी मारली.  आता पुन्हा एकदा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधुसूदन केंद्रे शिवसेनेचे विशाल कदम आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांच्या लढत होणार का तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये ही जागा कोणाला सुटते हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्वांमधून आता राशी आपला पुन्हा एकदा येथे बाजी मारता येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 आता  पाहुयात परभणी विधानसभा मतदारसंघ .
 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघ क्रमांक ९६ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी, पिंगाळी, परभणी ही महसूल मंडळे आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी येथे सलग दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. मतदारसंघातील विधानसभेचे विद्यमान सदस्य (आमदार) शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील [१] आहेत ज्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद गौसे झैन यांचा ८१,७९० मतांनी पराभव केला.  2014 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेन 1, राष्ट्रवादीने 2 तर 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. युतीमध्ये दोन्ही पक्षांनी यातील 2-2 जागा घेतल्या आहेत.  1990 पासून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परभणी  1972 साली पहिल्यांदा इथे कॉंग्रेसने विजय मिळवला होता. मात्र 1990 पासून परभणी जिल्ह्यात शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांनी परभणी  मधून खासदार झालेले त्यांच्याच पक्षाचे दोन वेळा आमदार संजय हरिभाऊ जाधव यांची जागा घेतली. 2019 मध्ये परभणी मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आमदार राहुल पाटील आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली होती.  कॉंग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी  केल्यामुळे लढत तिरंगी झाली. तसेच एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन  झाले. 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि ते काही आमदार सोबत घेऊन भाजप सोबत युती केली . परंतू  राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे ठरवले आणि ते आताही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. तसे पाहता महाविकास आघाडी साठी सहानुभूतीचे वातावरण आहे असे बोलले जाते . त्यामुळे पुन्हा एकदा राहुल पाटील यांना आमदार होण्याची संधी भेटेल का तसेच 2024 मध्ये पुन्हा एकदा राहूल पाटील शिवसेनेचा गड राखणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तिसरा मतदारसंघ तो म्हणजे पाथरी
 महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  पाथरी विधानसभा मतदारसंघ क्रमांक ९८ हा आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पाथरी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. पाथरी, २. मानवत आणि ३. सोनपेठ ही तालुके आणि ४. परभणी तालुक्यातील पेडगांव, सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो.  पाथरी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 1990 पासून शिवसेनेच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला.  पुन्हा 2009 साली शिवसेनेच्या मीरा रेंगे विजयी झाल्या आणि 2014 साली अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी बाजी मारली. .2019 ला बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे, भारतीय जनता पार्टीचे आ.मोहन फड, काँग्रेसचे सुरेश वरपूडकर, आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके, बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर, वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांच्यामध्यें लढत होती.
2019 ला इथे काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादास वरपूडकर यांनी बाजी मारली . 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) पक्षाचे जाधव संजय` 6,01,343 मते मिळवून विजयी झाले. त्यामुळे आता 2024 च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना पाथरी या जागेवर दावा करू शकते तसेच आता ही जागा काँग्रेसकडे आहे त्यामुळे इथे नक्की बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.  जिंतूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक  ९५ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सैलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. जिंतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.  भारतीय जनता पक्षाच्या मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर ह्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.1990 पासून जिंतूर विधानसभा मतदारसंघात बोर्डीकर, कुंडलिक नागरे आणि विजय भांबळे यांची सत्ता राहिली आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय भांबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर त्यांचे विरोधात भाजपच्या मेघना दीपक साकोरे ह्या उभ्या होत्या.  परंतु 2019 मध्ये मोदी लाट असल्यामुळे भाजपच्या मेघना दीपक साकोरे ह्या विजय ठरल्या. परंतु आता 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आता ही जागा कोणाला मिळणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे ह्या जागेवरती आता कोण दावा करणार हे लवकरच समजेल. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुढे महायुती पुन्हा एकदा टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ यांचा लेखाजोखा.  तर मंडळी तुम्हाला काय वाटते परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार हवा हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.

Exit mobile version