नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उदगीर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे तर उर्वरित पाच मतदारसंघ मराठा समाजाचे आमदार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ , लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, निलंगा, अहमदपूर , औसा, उदगीर असे सहा विधानसभा मतदारसंघ हे लातूर जिल्ह्यामध्ये येतात .
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लातूर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा चेहरा समोर येतो तो म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे . 1995 पर्यंत ते सलग तीन वेळा या जागेवर निवडून आले. 1999 पासून ते 200९ पर्यंत सलग दोन वेळा निवडून आले. लातूर शहरांमध्ये काँग्रेस पक्षाचे पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरांमध्ये भाजपला फारसे मिळाले नाही. 1980 ते 2009 यामध्ये 1995 हे वगळता सलग पास्ट टर्म विलासरावांनी या मतदारसंघांमध्ये वर्चस्व गाजवले होते.
लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
लातूर जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उदगीर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३७ आहे. उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उदगीर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबुराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे संजय बाबूराव यांनी भारतीय जनता पक्षाचे अनिल सदाशिव कांबळे यांचा 20579 मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला. उदगीर येथे 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकीला भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे सलग दोन टर्म निवडून आले होते. तसेच सुधाकर भालेराव उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला उभे करण्याचा मोठा वाटा आहे. परंतु 2019 मध्ये सुधाकर भालेराव यांचे भाजपने तिकीट कापले आणि अनिल कांबळे यांना हे तिकीट दिले. कारण गटबाजी पक्ष अंतर्गत नाराजी वाढली होती हे सर्व भाजप पक्षामध्ये 2014 च्या अगोदर पासून चालू होते.
परंतु 2014 मध्ये मोदीला असल्यामुळे तिथे सुधाकर भालेराव हे निवडून आले होते. सुधाकर भालेराव यांचा उदगीर या विधानसभा मतदारसंघांमध्ये पाय खोलवर लावला गेला होता तरीही 2009 आणि 2014 येथे सुधाकर भालेराव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बनसोडे हे निवडणूक लढवायचे सोडत नव्हते. असंच करत संजय बनसोडे यांचा जनतेशी कनेक्शन वाढत गेले तसेच संजय बनसोडे यांची ओळख झाली तयार झाली ती म्हणजे मतदारांच्या वाईट काळात दुःखामध्ये धावून जाणारा माणूस तो म्हणजे संजय बनसोडे. 2019 मध्ये उदगीर मध्ये असेच बोलला जात होतो की सुधाकर भालेराव यांचा तिकीट फिक्स आहे परंतु अचानक सुधाकर भालेराव यांचं तिकीट कापले गेले आणि ते ऐवजी अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे उदगीर येथील मतदार नाराज झाले आणि याचाच फायदा संजय बनसोडे यांना झाला त्यामुळे 2019 मध्ये संजय बनसोडे ही विजयी ठरले. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे संजय बनसोडे यांना राज्यमंत्रीपद हे देण्यात आलं परंतु राष्ट्रवादीचे फुटी नंतर संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत महायुतीत गेले तेथेही त्यांना क्रीडामंत्री पदाचा कारभार सांभाळण्यासाठी भेटला तसेच त्यांना परभणीचं पालकमंत्री पद भेटले त्यामुळे संजय बनसोडे नाव आणखीच चर्चेत आले.
आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुधाकर भालेराव हे पुन्हा एकदा इच्छुक होते परंतु त्यांना दिसत होते की महायुतीत आता त्यांना तिकीट भेटणार नाही कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित दादा घेतील आणि तिथून संजय बनसोडे हेच उभे राहणार त्यामुळे त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. यावरून असेच दिसत आहे की आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संजय बनसोडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव अशी लढत होईल. आता विद्यमान आमदार संजय बनसोडे हे पहिल्या स्टार मध्ये सतत राहिलेले त्यांनी अनेक विकास कामांसाठी भरून निधी उदगीर मध्ये आणला तसेच अनेक काम मंजूर करून ती चालू आहेत परंतु गावाकडील रस्ते तसेच बेरोजगार लोक या गोष्टी उदगीर मध्ये अजूनही पाहायला मिळतात. तसेच उदगीर हा जिल्हा होणार ही स्वप्न मतदारांना दाखवण्यात आली होती परंतु उदगीर अजूनही जिल्हा झालेला नाही त्यामुळे या प्रश्नांनाही संजय बनसोडे यांना सामोरे जावे लागणार आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवाराला चार हजाराचं लीड मिळाले होते त्यामुळे अजूनही असे दिसत आहे की उदगीर येथील मतदारांच्या मनात संजय बनसोडे हे नाव फ्रंटला आहे त्यामुळे संजय बनसोडे यांचे पारडे जड राहणार आहे. तर सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात गेल्यामुळे शरद पवारांच्या बाजूने मुस्लिम दलित मतं तसेच सहानभूती आहे त्यामुळे येथे सुधाकर भालेराव यांचे जिंकण्याची ही चान्सेस जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुधाकर भालेराव विरुद्ध संजय बनसोडे यांचा अतिथटीचा सामना पाहायला भेटणार आहे.
दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे औसा
औसा येथे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. औसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा . त्यानंतर इथे शिवसेनेने आपले वर्चस्व तयार केले. चला तर पाहूया आता येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी असा या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की चाललंय तरी काय? हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. औसा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३९ आहे. औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या १. औसा तालुक्यातील लामजाना, मातोळा, किल्लारी, औसा ही महसूल मंडळे आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कासार शिरसी, कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. औसा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यु दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार 95,340 मते मिळवून विजयी झाले. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वाराव पाटील यांचा 26714 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बसवराज माधवराव पाटील 64,237 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे दिनकर बाबुराव माने यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 1999 ते 2009 पर्यंत पावसाळी ते शिवसेना पक्षाचे दिनकर माने हे आमदार होते. शिवसेनेचे दिनकर माने हे सनम दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत. विधानसभा मतदारसंघाचे 1999 नंतर पाहिलं तर शिवसेना , काँग्रेस, आणि भाजप असे उमेदवार निवडून आलेले दिसतात. 2009 आणि 2014 हे सलग दोन टर्म येथे काँग्रेसचे बसवराज पाटील हे जिंकून आलेले आहेत .
2019 मध्ये देवेंद्र फडवणीस यांनी शिव सेने सोबत युती केली आणि या युतीमध्ये त्यांनी औसा येथील जागा भाजपने मिळवली. तर 2019 मध्ये देवेंद्र फडवणीस यांचे पीए अभिमन्यू पवार यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले. 2019 मध्ये अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून अभिमन्यू पवार यांनी औसा येथे बाजी मारली. त्यामुळे औसा येथे प्रथमच कमळ फुलले. त्यानंतर येथे बरेच राजकीय उलथापालन झालेले दिसते कारण शिवसेना फुटी नंतर माजी आमदार दिनकर माने हे शिवसेना ठाकरे गटात राहिले तर काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता औसा येथे भाजपकडून नक्की तिकीट कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण आता भाजपमध्ये बसवराज पाटील हे इच्छुक आहे तर स्टॅंडिंग आमदार अभिमन्यू पवार हे इच्छुक आहे त्यामुळे आता भाजप तिकीट कोणाला देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तर महाविकास आघाडी कडून पुन्हा एकदा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांना तिकीट मिळेल अशा चर्चा आहेत. तर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्या बद्दल बोलायचं झाले तर त्यांनी रस्त्यांची कामे केले आहेत तसेच विविध योजनांची अंमलबजावणी करताना ते दिसले आहेत त्यांनी बंद पडलेल्या किल्लारी सहकार कारखाना पुन्हा एकदा सुरू केला आहे. त्यामुळे एकंदरीत इथे भाजपसाठी चांगले वातावरण आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये औसा येथून शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला चांगले लीड मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिनकर माने हे आमदार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा . त्यामुळे एकंदरीत येथील सामना अतिथटीचा पाहिला भेटणार आहे.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अहमदपूर
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३६ आहे . अहमदपूर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पुर्वी हा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अहमदपूर चाकूर हा अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु 2019 ला अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांनी येथे गुलाल उधळला. अहमदपूर चाकूर येथे चार वेळा काँग्रेस आणि तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून येत होता.
2014 मध्ये मोदी लाट असतानाही अहमदपूर चाकूर येथे अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत गेले. त्यामुळे बाबासाहेब पाटील यांचे विरोधक माजी आमदार विनायक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदपूर चाकूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायक पाटील अशी लढत होईल असे दिसत आहे. अहमदपूर चाकूर येथे कोणतीही रोजगाराची संधी नाही. तसेच इथे पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे उजाड शेत माळरान अशीच अवस्था पाहायला दिसते. येथे पडतो तो फक्त घोषणांचा पाऊस. आणि घोषणांचा पाऊस पडला की तिथून निवडणूक जिंकल्या जातात.
परंतु अहमदपूर चाकूर येथे कोणताही चांगला विकास झालेला दिसत नाहीत. त्यामुळे इथे सतत कोणत्या ना कोणत्या पक्षाचा आमदार निवडून दिला जातो. परंतु मतदारांच्या अपेक्षा मात्र या उमेदवाराकडून पूर्ण होत नाही. 2009 मध्ये इथे रासपकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेस कडून विनायक पाटील अशी लढत झाली परंतु 2009 मध्ये काँग्रेसला डावलून अहमदपूर मतदारांनी रासप चे बाबासाहेब पाटील यांना निवडून दिले. त्यानंतर 2014 मध्ये बाबासाहेब पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे अहमदपूर चाकूर येथील मतदारांना आवडले नाही म्हणून 2014 मध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले विनायक पाटील हे विजयी झाले. 2019 ला विनायक पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश अहमदपूर चाकूर मतदारांना आवडला नाही त्यामुळे त्यांनी 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील यांना जिंकून दिले.
2019 ला असेच वाटत होते की विनायकराव पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील परंतु भाजपमधील अंतर्गत नेत्यांनीच विनायकराव पाटलांना मदत केली नाही अशा चर्चा रंगल्या आहेत त्यामधील दिलीपराव देशमुख अयोध्या केंद्र यांनी बंडखोरी केली आणि मतदान फिरवले यामुळे बाबासाहेब पाटील यांचा फायदा झाला आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील हे येथे निवडून आले. हे सर्व पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशीच निवडणूक पाहायला भेटेल. तर बाबासाहेब पाटील हे अजित दादा पवार गटात गेल्यामुळे येथील मतदार संघ त्यांच्यावर काहीसा नाराज आहे परंतु बाबासाहेब पाटील यांची कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर एखादी होल्ड आहे.
तसेच ते सध्या सत्तेत असल्यामुळे त्यांनी विकास कामांसाठी भरभक्कम निधी आणला आहे. परंतु निधी आणूनही कामे झालेली दिसत नाहीत कारण तिथे अजूनही डोंगरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्थलांतराचा प्रश्न यांचा तोडगा काढलेल्या दिसत नाहीये. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी बाबासाहेबांना अवघड तीन हजाराचा लीड देण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे इथे वाटत आहे की बाबासाहेब पाटील यांना ही निवडणूक जड जाणार आहे. तर अहमदपूर चाकूर येथील दलित मुस्लिम वंजारी आणि धनगर मतदार कुणाच्या बाजूने राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यावरती निकाल अवलंबून राहणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे निलंगा
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३८ आहे . निलंगा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. शिरूर अनंतपाळ तालुका, २. देवणी तालुका आणि ३. निलंगा तालुक्यातील अंबुलगा, औराड शहाजानी, निलंगा ही महसूल मंडळे आणि निलंगा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. निलंगा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे संभाजीराव दिलीपराव निलंगेकर-पाटील हे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे निळंगेकर संभाजी दिलीपराव पाटील 97,324 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निळंगेकर संभाजी दिलीपराव पाटील 76,817 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. निलंगा येथे काँग्रेस या पक्षाने जास्त काळ वर्चस्व गाजवलेले आहे. निलंगा येथे काँग्रेसने जवळपास दहा वर्ष वर्चस्व गाजवलेले आहे. 1962 ते 2004 पर्यंत निलंगा येथे काँग्रेसचे वर्चस्व होतं. अगदी 2009 ला ही येथे काँग्रेसचे उमेदवार अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जिंकून आले होते. 2004 मध्ये सर्वात पहिल्यांदा भाजपचे उमेदवार संभाजीराव पाटील यांनी प्रथमच येथे कमल फुलवले.
2004 च्या निवडणुकीच्या अगोदर शिवाजीराव पाटील यांच्या घरामध्ये कौटुंबिक वाद झाले आणि याच कौटुंबिक वादाचा फायदा भाजपने उचलला. शिवाजीराव पाटील यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांना 2004 साली येथून उमेदवारी भाजपने जाहीर केली. तरुण नेतृत्व असल्यामुळे 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांना ही निवडणूक जिंकण्यात यश आले. परंतु 2009 मध्ये हे यश टिकवण्यात ते अपयशी ठरले.
2009 मध्ये येथे पुन्हा काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवत ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती. परंतु 2014 मध्ये शिवाजीराव पाटील यांचे वय झाल्यामुळे त्यांनी त्यांचे पुत्र अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली होती. परंतु 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाट असल्यामुळे येथे शिवाजी राव पाटिल यांचे पुत्र अशोक पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला . त्यामुळे 2014 आणि 2019 असे सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक पाटील यांची नातू संभाजीराव पाटील हे येथे गुलाल उधळत आहे. तर हा गुलाल ते त्यांचे काका अशोक पाटील यांच्या विरोधात उधळत आहेत. कारण शिवाजीराव पाटील यांनी 2014 मध्ये त्यांचा मुलगा अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती. तर आता त्यांना 2024 मध्ये ही तिसरी टर्म गाजवण्यासाठी निलंगा विधानसभा मतदार त्यांना ही एक संधी देणार का हे पहाने महत्त्वाचे ठरणार आहे.
तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जणांना स्वप्न पडू लागले आहेत. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये निलंगा येथे काँग्रेस पक्षाला लीड जास्त भेटलेले आहेत. त्यामुळे ते इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच ज्या कुटुंबियाने काँग्रेस पक्षाचा वारसा निलंगा येथे चालवला असे शिवाजीराव पाटील यांचे पुत्र अशोक पाटील यांना 2024 मध्ये काँग्रेस उमेदवारी देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष नवीन चेहरा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर भाजपचे नेते संभाजीराव पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांनी एकदा स्वतःच्याच आजोबांना तर दोन वेळेस स्वतःच्या काकांचा पराभव केलेला आहे . संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संस्थात्मक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलं होल्ड मिळवायला सुरुवात केली आहे. परंतु सत्तेत महत्त्वाच्या पदांवर राहून देखील ते निलंगा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास त्यांना फारसे यश मिळाले नाही. निलंगा मध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी , शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पांचा अभाव तसेच पाण्याचा प्रश्न येथे कायम आहे. तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संभाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी भेटेल. परंतु महाविकास आघाडी कडून अशोक पाटील निलंगेकर तसेच डॉक्टर अरविंद भातंबरे अभय साळुंखे हे इच्छुक असल्याचं बोलले जात आहे.
आता पाहू पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लातूर शहर
लातूर हे शहरामध्ये जिल्हा मुख्यालय असलेले महाराष्ट्रातील 16 वे सर्वात मोठे शहर आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागांतर्गत येतो. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लातूर या विधानसभा मतदारसंघाला खूप मोठा इतिहास आहे. चला तर पाहूया मग आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लातूरमध्ये यावर्षीही देशमुख पॅटर्न चालणार का? लातूर येथे 2008 नंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असे दोन भाग पडले आहेत.
सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात लातूर शहर विधानसभा मतदारसंघ
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३५ आहे.
हा लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लातूर शहर मतदारसंघात लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. २००८ नंतर,लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये विभागला गेला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमित विलासराव देशमुख हे लातूर शहराचे विद्यमान आमदार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे . 1995 पर्यंत ते सलग तीन वेळा या जागेवर निवडून आले. 1999 पासून ते 200९ पर्यंत सलग दोन वेळा निवडून आले.
लातूर शहरांमध्ये काँग्रेस पक्षाचे पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरांमध्ये भाजपला फारसे मिळाले नाही. 1980 ते 2009 यामध्ये 1995 हे वगळता सलग पास्ट टर्म विलासरावांनी या मतदारसंघांमध्ये वर्चस्व गाजवले होते. लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. पण 2009 ला एक नवीन मतदार संघ तयार झाला. आणि विलासराव देशमुखही दिल्लीच्या राजकारणात जास्त लक्ष घालू लागले त्यामुळे 2009 मध्ये विलासराव देशमुख यांनी त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना लातूर शहर येथून उमेदवारी जाहीर केली. 2009 ते 2019 असे सलग तीन टर्म अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचा पंजा लातूर शहरामध्ये कायम ठेवला आहे.
लातूर शहर या विधानसभा मतदारसंघा वरती 2014 आणि 2019 येथे मोदी लाटेचा कोणताही परिणाम झाला नाही. कारण अमित देशमुख यांना विलासराव देशमुख यांची पुणे कामाला आली अस म्हणायला हरकत नाही. अमित देशमुख यांचा फक्त एका मतदारसंघावर नाही तर पूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल आहे त्यामुळे ते लातूर या शहरातून आरामात निवडून येतात. यामागील तीनही निवडणुकीमध्ये भाजपचे शैलेश लाहोटी हे अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते परंतु येथे भाजपला यश मिळवता आले नाही. त्यामुळे आता अमित देशमुख यांच्याविरुद्ध कोण असा प्रश्न भाजपला पडला आहे कारण अमित देशमुख यांना टक्का देण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केले आहेत तसेच अमित देशमुख यांच्या विरुद्ध भाजप नवीन चेहऱ्याला संधी देतील अशा चर्चा रंगल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल पाहता अमित देशमुख हे गेले पंधरा वर्षे आमदार आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेला काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भरभक्कम लीड देऊन लातूरमध्ये फक्त देशमुख पॅटर्न चालतो हे दाखवून दिले आहे.
त्यामुळे भाजप पुढे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा एक चॅलेंज उभे राहिले आहे. ते म्हणजे अमित देशमुख यांना लातूर शहर विधानसभा निवडणुकीला पाडायचे कसे ? त्यासाठी भाजपने लातूर शहर येथून अजित पाटील कव्हेकर यांची उमेदवारी फिक्स केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु विलासराव देशमुख तसेच अमित देशमुख यांनी लातूर शहरांमध्ये केलेली विकासाची कामे तसेच एमआयडीसी रेल्वेची कामे हे पाहता अमित देशमुख यांचे पारडे जड राहत आहे. लातूर शहरांमध्ये अजूनही काही ठिकाणी गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला नाहीये तसेच काही शहरातील पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे तर हेच मुद्दे भाजपचे अजित पाटील कवेकर हे निवडणुकीत उचलतील कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी एवढेच मुद्दे असतील. लातूर शहरामध्ये मुस्लिम दलित व मराठा समाज यांचे मतदान कायम काँग्रेसलाच होते. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी अमित देशमुख यांनी लिंगायत समाजाचा खासदार निवडून दिला आहे त्यामुळे यावेळी अमित देशमुख यांच्या पारड्यामध्ये लिंगायत समाजाची मते ही पडू शकतात. त्यामुळे अमित देशमुख यांचे पारडे जड राहणार आहे. तर या अगोदर खासदार म्हणून लातूर शहरावरती दहा वर्ष भाजपचे वर्चस्व होते परंतु ते वर्चस्व लातूरकरांनी मोडीत काढले आहे. त्यामुळे येथील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपही लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आहे परंतु आता लातूर शहर मतदार संघ येथील जनता कोणाला पसंती देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लातूर ग्रामीण
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३४ आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. रेणापूर तालुका २. लातूर तालुक्यातील मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा ही महसूल मंडळे आणि ३. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो. लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००८ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धिरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2008 मध्ये हा मतदारसंघ प्रथमच उदयास आला तेव्हापासून इथे काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. येथे 2009 पासून ते 2019 पर्यंत फक्त काँग्रेस पक्षाचेच उमेदवार इथून निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुत्र धीरज देशमुख हे येथे निवडून आले होते. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी कडून धीरज देशमुख यांनाच येथे उमेदवारी भेटेल व त्यांचे येथे जिंकून येण्याचे ही चान्सेस जास्त आहेत. तर महायुतीकडून येथे कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येथील सामना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा पहिला भेटेल त्यामध्ये काँग्रेस पक्षविरुद्ध भाजप असा सामना रंगेल. तर मंडळी अशा सर्व हालचाली आहेत लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आपलं वर्चस्व टिकू शकेल का हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा.