Site icon

कोरेगाव विधानसभा निवडणुक 2024 | Koregaon satara Vidhansabha Election


प्रतिनिधी – पी के भांडवलकर
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे.
आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाबद्दल.
कोरेगाव येथे शशिकांत शिंदे यांना आमदार होण्याची संधी भेटणार का?
महेश शिंदे पुन्हा एकदा बाजी मारणार का?
चला तर पाहूया कोरेगाव या विधानसभा मतदारसं घ येथे विधानसभा निवडणुकीच्या धुरळा नक्की कसा असणार आहे
यावेळी कोरेगाव येथे गुलाल नक्की कोण उधळणार?
महायुतीची शिंदे की महाविकास आघाडीचे शिंदे?
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक २५७ आहे.
 कोरेगाव मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसेगांव आणि खटाव ही महसूल मंडळे, २. कोरेगांव तालुक्यातील सातारा रोड,
किन्हई, कुमठे आणि कोरेगांव ही महसूल मंडळे आणि ३. सातारा तालुक्यातील बडुथ, खेड आणि तासगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.
कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
शिवसेना फुटी नंतर महेश शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.
https://youtu.be/rYpUnQ9fZKg?si=sMcXWZRZcl5EvGD4
राष्ट्रवादीकडुन शशिकांत शिंदे यांनी 2009 साली प्रथमता कोरेगाव मतदारसंघातुन निवडणुक लढवली होती.
 शशिकांत शिंदे २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा लागोपाठ या मतदार संघातून निवडून आले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे महेश संभाजीराजे शिंदे 1,01,487 मते मिळवून विजयी झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शशिकांत जयवंतराव शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 6,232 मते एवढे होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे शशिकांत जयवंतराव शिंदे 95,213 मते मिळवून विजयी झाले.
काँग्रेस पक्षाचे कणसे विजयराव बाबुराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 47,247 मते. एवढे होते.
कोरेगाव मतदार संघामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे
तर महायुतीकडून महेश शिंदे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे अशी चर्चा रंगली आहे.
या अगोदरही शशिकांत शिंदे कोरेगाव येथून 2009 आणि 2014 असे सलग दोनदा येथे आमदार झाले होते.
तर 2019 मध्ये येथे बाजी मारली ते म्हणजे महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनी.
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता येथे असेच दिसत आहे की कोरेगाव मध्ये महायुतीचे आमदार महेश शिंदे यांचे पारडे जड राहणार आहे.
कारण लोकसभा निवडणुकीमध्ये येथे शशिकांत शिंदे यांना पाहिजे तेवढे भेटलेले नाहीत.
तसं पाहायला गेलं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा.
परंतु या बालेकिल्लाला सुरुंग लागला. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यंतरी पक्षांमध्ये जी फूट पडली त्याचाही बराचसा परिणाम झालेला दिसतो.
त्यामुळे शशिकांत शिंदे यांची खासदारकी थोडक्या मतांवरून गेलेली दिसते.
त्यामुळे आता याचा वचपा शशिकांत शिंदे आता विधानसभा निवडणुकीमध्ये काढणार हे नक्की आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात लोकशाहीविरोधात ठोकशाही अशी लढत असेल.
 काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच लढणार आहे. त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडले आहे.
तर महायुतीकडून हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडावा यासाठी येथील कार्यकर्ते मागणी करत आहे.
कारण मागील निवडणूक शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
त्यामूळे आता ही जागा महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भेटणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.?
तरी आता येणारी आगामी विधानसभा ही महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार महेश शिंदे यांची लढत येते पाहायला भेटणार आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कोरेगाव येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Exit mobile version