Site icon

कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे. अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
याची चाचपणी पक्षात केली जात आहे.
 त्यात काही नावे पुढे येत आहे. या वेळी तरूण चेहऱ्याला संधी दिली जावी असा एक मत प्रवाह आहे.
शिवाय संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणारा नेता असावा असंही बोललं जात आहे. शिवाय पटोले हे ओबीसी होते. यावेळी मराठा समाजाच्या नेत्याला संधी दिली जावी यासाठी आग्रह होत आहे.
चला तर पाहूया काँग्रेस या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी कोणत्या नेत्यांची नावे पुढे येत आहेत.
नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
चेन्नीथाला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नागपुरमध्ये आले.
रात्री आठ वाजता ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी सर्व आजीमाजी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली.
त्यामुळे नाना पटोले यांची पायउतार अटळ मानली जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि ४४ आमदार असताना काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर सोपवली होती.
 त्यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आता फक्त १६ आमदार शिल्लक राहिले आहेत.
त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा आणि दुसऱ्या कारणाची गरज नाही असे व्यक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळवले होते. त्याचे श्रेय नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्याकडे घेतले.
आता पराभवाची जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागेल असे यापूर्वी माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे म्हणाले आहे.
तत्पूर्वी नाना पटोले यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे असे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना दिले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी त्यांनी विधानसभेत काँग्रेसचा गटनेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पटोले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा यास विरोध आहे. दुसरीकडे पटोले यांचे समर्थकसुद्धा त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी करीत आहेत.
तर नागपुरमध्ये काँग्रेसभवन येथे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी एकास एक संवाद साधला.
 त्यावेळी ते बोलत होते, ही बैठक फक्त गटनेता निवडीची बैठक नसून पक्षाचा गट नेता कोण असावा, याशिवाय प्रदेशाध्यक्ष कोण असावा याबाबत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी विषयी निवडणुकी दरम्यान काय तक्रारी किंवा सल्ले आहेत ते ही चेन्नीथला जाणून घेत आहेत.
पक्षाच्या नेत्यांकडून केवळ फीडबॅक घेतली जात आहे.
चेन्नीथला या संवादातून निघालेली आपली माहिती आणि निष्कर्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शीर्ष नेत्यांपुढे ठेवतील. त्यानंतर नावांची घोषणा होईल.
प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव जर कोणाचे असेल तर सतेज पाटील यांचे आहे.
सतेज पाटील हे कोल्हापूरचे असून सध्या विधान परिषदेवर आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. या निमित्ताने काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार उपस्थित आहेत.
त्यांच्या बरोबर चर्चा करताना सतेज पाटील यांचे नाव समोर आले आहे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व गुणांसोबत , सामाजिक समीकरण देखील चर्चिले जात आहे.
त्यात नाना पटोले हे ओबीसी कुणबी समाजाचे आहेत. तर बंटी पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला राज्याचे अध्यक्ष पद दिले तर एक चांगला संदेश जाईल असे, काँग्रेस आमदार बोलत आहेत.
प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच काँग्रेसचा विधानमंडळ पक्षनेता आणि गटनेताही निवडला जाणार आहे.
या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत.
 गटनेता पदासाठी नाना पटोले आणि विजय वेडट्टीवार यांच्या रस्सीखेच आहे. तर नितीन राऊत यांनाही संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
 तर प्रदेशाध्यपदासाठी सतेज पाटील यांच्यासह विश्वजित कदम यांनाही संधी दिली जावू शकते.
 तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात या जेष्ठ नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्याही नावाचा विचार होवू शकतो
राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला पक्षश्रेष्ठींना काय अहवाल सादर करतात यावरच पटोले यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Exit mobile version